अंतर मनातले आणि अंतर क्षणांंतले

Started by Tejas khachane, March 10, 2017, 12:17:29 PM

Previous topic - Next topic

Tejas khachane

अंतर मनातले आणि अंतर क्षणांंतले
निरंतर असे वाढतच गेले
क्रोध, द्वेष भावना
यांना स्थान मिळतच गेले

कळलेच नाही कधी
आपण एवढे दूर गेलो,
तारेवरचि कसरत करुनही
स्वतालाच भुलत गेलो

आयुष्य म्हणजे वेळ
हे तर गणितच झाले
वेळ देऊन वेळे पाठोपाठ
आपण ही पळत राहिलो

धाव आता कुठतरी ही
शिथिल् करायची म्हणतो
नव्या तरने आयुष्या कड़े
पुन्हा एकदा पाहायचे म्हणतो

अवघड अशा या वाटेवरती
साथ तूझी हवी आहे
हिरमुसलेल्या वळनावरती
प्रित तुझी हवि आहे

शब्द पठाउन विचारतो मी
साथ मजला देशील का
वाट पाहतो तुझी अजूनही
प्रीत मजला देशील का

प्रीत मजला देशील का......

TSK