मला पहायचंय तुला

Started by Rahul Ghorpade, March 10, 2017, 01:38:04 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

मला पहायचंय आता तुला दुस-याची होताना
त्याच्यासोबत तुला
सात फेरे घेताना
मला पहायचंय तुला....

मला पहायचंय तुझ्या
भांगात त्याला कुंकू भरताना
तुला त्याला
सात वचने देताना
मला पहायचंय तुला....

मला पहायचंय तुला  माझ्याशी नात तोडून त्याच्याशी नात जोडताना
त्याच्यासोबत हे आयुष्य जगताना
मला पहायचंय तुला...

तुझ्या लग्नात
मला बोलवं हा
मला पहायचंय आहे तुला
मला विसरून
आयुष्यात पुढे जाताना....

मला पहायचंय तुला
आता दुस-याची होताना
तोडून नाते माझ्याशी सगळे
त्याच्यासोबत एक एक नात निभवताना
मला पहायचंय तुला....

मला पहायचंय आता तुला सुखी संसार करताना
विसरून जायचं हा मला तु
आणी त्याच्यासोबत सुखी जीवन जगताना
मला पहायचंय तुला...
                                   राहुल घोरपडे