होळी

Started by Asu@16, March 12, 2017, 10:23:19 AM

Previous topic - Next topic

Asu@16

       होळी

रंगभेद विसरून या रे !
गाऊ नाचू आज सारे
तोडून सारे जातीबंध
नाचू आज होऊन धुंद
पुरणाची गोड पोळी
नैवेद्य देऊ, पेटवू होळी
लावून आज गुलाल भाळी
देऊ समतेची हाळी
दुख-दुष्टांची बांधून मोळी
जाळून टाकू, खेळू होळी
लिंगभेद, श्रद्धा भोळी
विषमतेला मारू गोळी
वाईट-साईट, कळकट-मळकट
वाहू होळीस तिमिरांचे घट
स्वच्छ करून समाज तनमन
घडवू भूवर नंदनवन
        होळी माते त्रिवार वंदन !
        होळी माते त्रिवार वंदन !

- अरूण सु.पाटील
  (12.03.2017)

https://www.facebook.com/AsuChyaKavita