खाकी जागते तेंव्हा..

Started by कदम, March 12, 2017, 12:33:13 PM

Previous topic - Next topic

कदम

खाकी जागते जेव्हा...!

माजतो दानव जेंव्हा
मानवता ही नमते तेंव्हा
हाहाकार करतात ! गुन्हे जेंव्हा
कर्दनकाळ बनुनी लाठी जागते तेंव्हा..!

देशाचा घात जेंव्हा
होई रक्तपात तेंव्हा
जळते विस्तवात राष्ट्र जेंव्हा
रणांगणी खाकी गाजते तेंव्हा....!

आतंक घुसखोरी होते जेंव्हा
संकट भारी येते तेंव्हा
-हास नैतिकतेचा होतो जेंव्हा
शौर्य खाकीचे जागते तेंव्हा....!

नाश दुष्टांचा होतो जेंव्हा
मानवता नांदते तेंव्हा
स्वातंञ्य लाभते तेंव्हा
खाकी जागते जेंव्हा
सत्यमेव जयते ! नारा होतो तेंव्हा...!