जीवनच झाले हे

Started by कदम, March 14, 2017, 02:41:03 PM

Previous topic - Next topic

कदम

जीवनच झाले हे .!

हरवून स्वप्नात गेलो
न्हाहून शब्दात घेतले
चिंब चिंब ओले ओले झाले
प्याले ओव्यांचे नित्य पिले

पाघरला शालू लेखनीचा
सुरेख मंजूळ कवितेचा
लढवून तर्क रचतो ओळी
केली शब्दांची गोड गोड गोळी

कधी कधी रंगतो विडा
आठवणींची घेवून रास
शब्दांची शब्दांशी चूरस
लेखनी होण्या सर्वस्वी सरस

धडपडतेय लेखनी ही
अजरामर होण्या शब्दांगणात
आकाशी पाताळी साहित्यसंग्रही
ओळ नी ओळी रगण्या सोहळी