जीवन सार्थक झाले...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 14, 2017, 08:27:36 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

अश्रू दाटून आले
स्वर निशब्द झाले
गुरुदेवांच्या चरणी माझे
ध्यान नतमस्तक झाले
भोळी भाबडी मूर्ती
तू दैवाचा मूर्तिकार
तुझ्या चरणी आहे
अद्वैताचा साक्षात्कार
तुमचे चरित्र वाचून
मन हेलावून गेले
आशीर्वादे तुमच्या माझे
जीवन सार्थक झाले
जीवन सार्थक झाले...

.....अंकुश नवघरे (स्वलिखित)