आंब्याचे झाड म्हणते

Started by कदम, March 15, 2017, 12:03:05 PM

Previous topic - Next topic

कदम


आंब्याचं झाड म्हणते

आळं खोडाशी कर ते
जल खतांनी भर ते
मोहर आला वर तो
मशागत ही कर ती !

वसंतात बघ बहरेल कैरी
तोंडीला होईल चमचमीत
लावू नको फांदीस सूरी
पाड आलेवर चाख भरपूरी !

बाजारी मज तू नेई
आमरस अक्षयतृतीयास होई
होतील दारो दार कोयी
रचतील बालके डाव कोयी-कोयी !

कलम आहे माझी नाजुक सालंय
जमल्या मुंग्याभुंग्यानी
रसगंधाच्या दुर्वाहकांनी
खोडाची होते हलाहलाय..!