प्रेमातील ब्रेकअप. ..

Started by Prem Mandale, March 15, 2017, 04:33:31 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

आज जरा प्रेमाविषयी सांगणार आहे
ब्रेकअप का होतात. ..
.
तुम्ही म्हणाल मला काय अनुभव
आहे का. .
तस काही नाही मनात आल म्हणून
लिहीत आहे. ..
.
आज काल चे मुल मुली एकमेकांच्या
प्रेमात पडतात. ..
खुप सारी स्वप्न बघतात. .
एक मेकांचा हात धरून रस्त्यावर
फिरतात...
कुणी बाईक वरून मोकळ्या
रस्त्याने निर्मळ हवेचा आनंद घेतात. ..
.
मुल काय बापाच्या पैशावरती पोरीना
फिरवतात ...
दररोज काही ना काही खरीदी करतात
सिनेमाला जातात ...
फक्त आणि फक्त मजा करतात
फुल बापाच्या पैशावर मजा करतात..
कारण कुणी विचारणार नसत आई
घर कामात असते...
बाप राब राब काम करतो आपल्या पोराच्या
आनंदासाठी.
पण हा पठ्ठ्या मात्र इकडे फालतु पैसे
उडवतो. ..
पण भविष्याचा कधी विचार करत नाही.
.
मग पुढे जावून हे जोडपे एकमेकांना
आयुष्यभर साथ देण्याच्या शप्पथा
घेतात. ..
.
मग मुल/मुली घरचे नाही म्हणतील
म्हणुन पळून लग्न करतात..
मग कुठ तरी खोली बघन ...
मग काही काम शोधन चालु होत ...
पण या पठ्ठ्यांना कुठे हो कामाची
सवय असते  कारण सर्व बापाच्या
पैशावरती मज्जा मारत होते...
.
मग त्याना समजत तेव्हा हा माज केला
नसता .. तर हे दिवस आले नसते
जेव्हा स्वता कमवून खर्च करण्याची वेळ
येते तेव्हा त्यांना आपला बाप आठवतो..
.
तो इकडून तिकडून काम बघतो
दोघांच्या पोटा पुरत कमवतो...
.
मग इथुन पुढे त्यांच्या नात्याला घोडा
लागायला सुरवात होते. ..
कारण यांना वेळ नसतो कामामुळे
त्यांच्या भविष्याचा विचार
करायला लागतात. . .
पण पोरींना सवय झालेली असते
मग त्या म्हणतात तु पहिल्यासारखा
राहिला नाही तुला आता माझ्यासाठी
वेळ नाही. .. तु कुठे फिरवत नाही
कुठे शाॅपिग ला नेत नाही. .
तुझ माझ्या वर आता प्रेमच नाही. ..
.
पोरी थोड्या पण समजुन घेत नाहीत
की पहिला हा एकटा होता ...
कुणी विचारणार नव्हत फक्त गाडी घेऊन
तुझ्या मागे फिरण एवढेच त्याच काम होत. .
.
पण आता तो एकटा नाही तु आहेस
सोबत. .
आता त्याच्या वर जबाबदारी आहे
तुझी आता तो भविष्याच्या विचार
करतोय. ..
.
त्याला या सर्व गोष्टी बदलण्यासाठी
भाग पाडतात. ..
आणि त्याला बदलावच लागत. ..
.
पण पोरी समजून घेतच नाही 
मग होतात दररोज भांडण चालु
हे भांडण एवढ वर पोहोचत की दोघांनाही
वेगळ होण्याची वेळ येते. ..
.
समजून नाही घेतल्यामुळे  एक चांगल्या
नात्यात दुरावा निर्माण होतो. .
.
म्हणुन सागतो मित्रानो/मैत्रीणीनो प्रेम
हा एक प्रवास आहे. ..
या प्रवासात एक जण जरी थकला
तर हा प्रवास शेवट पर्यंत अपूर्णच राहतो. ..
जर दोघांनीही एकमेकांना समजून घेतले तर
हा प्रवास शेवट पर्यंत सुरळीत होतो. ...
.
आवडल्यास शेअर करायला विसरू नका. .. :)
धन्यवाद. ... :)
.
स्वलिखीत :: Prem Mandale
१५/३/२०१

Worlikar chetana

Pratek veli mulagi chukichi nasate
as kahi nahi ki tila shoping karaychi asate, films baghaychya asatat, tila tyachi 5 min havi asatat jar to ti pn devu shakat nasel tar kay aarth aahe la tya bhavishyacha vichar karanyacha