" जुन्या आठवणी "

Started by Pramod Sambhaji Pawar, March 16, 2017, 02:43:48 PM

Previous topic - Next topic

Pramod Sambhaji Pawar

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मला ती गेटमध्येच दिसली ,
थोडीशी हसली तेव्हाच हृदयात माझ्या ती बसली
अरे ! होतीच ती तशी, जि चटकन हृदयात बसावी ,
तिला पाहुन वाटलं कि, कदाचित ती माझ्यासाठीच बनलेली असावी

काही दिवसांनी कॅन्टीनमध्ये तिच्याशी बोलून कळेना आता जगु कि मरू
कारण तिनं विचारलं होत कि, माझ्याबरोबर तुझ्यासाठी पण नाश्ता ऑर्डर करू ?
मी तिला प्रश्न केला  ,
अगं मला नाश्ता विचारावा असं तुला का बरं वाटलं !
तर ती हसतच म्हणाली,
अरे ! माझ्यामागे फिरून तुझं किमान बाटलीभर तरी रक्त आटलं !

मी म्हणालो ,
इतकीच करतेस काळजी माझी तर कर ना माझ्या प्रेमाचा स्वीकार !
इतक्यात आली जग मला आणि पुर्ण दिवसच गेला बेकार
" डिप्लोमा "ला पडलेलं हे स्वप्नं अजूनही मनात मोत्यांसारखं साठवलंय ,
" बी. ई "ला येईपर्यंत कित्येकदा एकांतातच आठवलंय

आता वाटतंय कि ,काही दिवसांनी शोध मोहीम सुरू करावी,
पण मिळेल का तिच्यासारखी कोण ? जि बघताक्षणी हृद्यातच शिरावी
अशी मुलगी मिळेल तेव्हा मिळेल पण परमेश्वराकडे आत्तापासूनच एक मागणं ,
कि नुसतं प्रेमावरचं नको थांबवु देवा थाटात होऊदे माझं तिच्याशीच लग्न !

                                                                      ~ प्रमोद संभाजी पवार
                                                                         मु.पो: सोनवडी , ता.दौंड , जि .पुणे

pramodpawar

#1

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मला ती गेटमध्येच दिसली ,
थोडीशी हसली तेव्हाच हृदयात माझ्या ती बसली
अरे ! होतीच ती तशी, जि चटकन हृदयात बसावी ,
तिला पाहुन वाटलं कि, कदाचित ती माझ्यासाठीच बनलेली असावी

काही दिवसांनी कॅन्टीनमध्ये तिच्याशी बोलून कळेना आता जगु कि मरू
कारण तिनं विचारलं होत कि, माझ्याबरोबर तुझ्यासाठी पण नाश्ता ऑर्डर करू ?
मी तिला प्रश्न केला  ,
अगं मला नाश्ता विचारावा असं तुला का बरं वाटलं !
तर ती हसतच म्हणाली,
अरे ! माझ्यामागे फिरून तुझं किमान बाटलीभर तरी रक्त आटलं !

मी म्हणालो ,
इतकीच करतेस काळजी माझी तर कर ना माझ्या प्रेमाचा स्वीकार !
इतक्यात आली जाग मला आणि पुर्ण दिवसच गेला बेकार

[/quote]