ये मरणा असा ...!!

Started by श्री. प्रकाश साळवी, March 16, 2017, 08:00:17 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

ये मरणा असा ....!!
---------------
ये मरणा ये असा लाजू नको
जीवनाला असा गांजू नको
**
माहित आहे रान हे पेटलेले
हे घना आता तु गरजू नको
**
बरसुन गेल्या श्रावणी सरी या
हे कोकीळे तु अशी माजू नको
**
आता ना राहिले शिल्लक प्रश्न काही
हे विधात्या तु आता उलजू नको
**
मला न वाटते मरणा भीती तुझी ही
अंगाई गाऊन तु आता जोजू नको
**
प्रकाश साळवी
१५/०३/२०१७
०९१५८२५६०५४