तुझ्या भक्तीत रमून जायचेय मला

Started by श्री. प्रकाश साळवी, March 16, 2017, 08:07:10 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तुझ्या भक्तीत रमून जायचंय मला
------------------------
तुझ्या भक्तीत रमून जायचंय मला
तुझ्या पालखीत थकून जायचंय मला
विटेवरी उभा युगे अठठाविस
पुंडलिका साठी आहे तू तिष्ठत
तुझ्या रंगात रंगून जायचंय मला  ||
**
तुझ्या भक्तीत रमून जायचंय मला
तुझ्या पालखीत थकून जायचंय मला
**
सावळी रे तुझी काया विठ्ठला
संत जनाई तुका सवे चोखामेळा
तव चरणांशी नत मस्तक व्हायचंय  मला ||
**
तुझ्या भक्तीत रमून जायचंय मला
तुझ्या पालखीत थकून जायचंय मला
**
झाले लीन वारकरी चंद्रभागेकाठी
ऐसा बा तु रे कनवाळू जगजेठी
आता पंढरपूरी चालून यायचंय मला ||
**
तुझ्या भक्तीत रमून जायचंय मला
तुझ्या पालखीत थकून जायचंय मला
**
प्रकाश साळवी
१२/०३/२०१७
बदलापूर- ठाणे
०९१५८२५६०५४