कृपादृष्टी...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 17, 2017, 10:11:38 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

गहिवरले मन माझे
शुद्ध ही हरपली
गुरुमाऊलीं नी माझी
जिद्द ही पारखली
खूप उंच पर्वत होता
सोबत होते माया मोह
अशीर्वादामुळे त्यांच्या
दिसला आनंदाचा डोह
मूर्ती होती थोर सान
तनु सुंदर सावळी
मुखावर तेज जसे
किरणे सूर्याची कोवळी
सिव्हासनी बैसले होते
होता राजेशाही थाट
हाती होता कमंडलू
मुखी संन्यासी रीवाज
उघडले नेत्र त्यांनी
उंचवला दक्षिण कर
आणि कृपादृष्टीने पाहून
दिला भक्तीचाच वर
दिला भक्तीचाच वर...

© .... अंकुश नवघरे.