ना कशाची आस!!

Started by श्री. प्रकाश साळवी, March 17, 2017, 07:27:40 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

ना कशाची आस ...!!
----------------
आता ना मला कशाची आस आहे
ना कशाचा मोह ना कशाचा ध्यास आहे
**
आहे जिकडे तिकडे भगव्यांचे बंड
हाका आरोळ्या देणाऱ्याचे वनवास आहे
**
ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ हा दुष्काळ आहे
विधात्याचा हा एक अनुप्रास आहे
**
आता येतिल दिवस सुखाचे समाधानाचे
हा तर दिसणारा सुखाचा भास आहे
**
भरपेट खिचडी साबूदाणा शेंगदाणा
काय तर म्हणे आज उपवास आहे
**
घर बंगला गाडी सारे माझेच आहे
नव्हे हो हा तर जगण्याचा अट्टाहास आहे
**
कधी असती बारा मास कधी तेरा
हा महिन्यातील एक मल मास आहे
**
आज ही जगतो साठीतही सुखाने
हा त्या नियंत्याचा " एहसास " आहे
**
प्रकाश साळवी
१७/०३/२०१७
०९१५८२५६०५४