नाही विसरू शकत मी तुला

Started by Rahul Ghorpade, March 18, 2017, 10:41:04 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुझ्या प्रेमाच्या
ह्या गोड आठवणी मी कधीच विसरू शकत नाही
तुझ्या सोबत
घालवलेले ते क्षण
मी कधीच
विसरू शकत नाही....

तुझा तो मधूर आवाज
मी माझ्या मनात
कानात साठवून ठेवला आहे
तुझे ते सुंदर डोळे
नितळ पाण्यासारखे
मी कधीच विसरू शकत नाही....

आता तुला
माझ्या आयुष्यातुन
जाऊन खूप वर्षे झालीत

तुला असं वाटत असणं
की मी आता तुला
विसरून ही गेलो असनं
पण तसं नाही गं

नाही विसरलो मी काहीच
आजही तुझी प्रत्येक आठवण माझ्या ह्रदयाच्या जवळ आहे...   
नाही मांडणार मी
माझा शंक
आता कधीचं
डोळ्यात अश्रू आले तरी

मी कधीच
विसरू शकत नाही गं तुला....
.....राहुल घोरपडे.....