ही कविता तिच्यासाठी

Started by Rahul Ghorpade, March 19, 2017, 12:32:46 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

ही कविता तिच्यासाठी

ही कविता तिच्यासाठी
जीने आयुष्याच्या
या वाटेवर हात धरला होता
माझा चार पावलांसाठी
ही कविता तिच्यासाठी

ही कविता तिच्यासाठी
माझ्या या बेरंग आयुष्यात
जिने आपल्या
प्रेमाचा रंग भरवला
आणी मला माझ्या आयुष्याशी
ओळख करून दिली
ही कविता तिच्यासाठी

ही कविता तिच्यासाठी
पाहून जिला माझ्या
ह्रदयाचे ठोके चुकता
नजरे आड जाऊ पर्यंत
हे डोळे एकटक
तिलाच पाहत बसतात
ही कविता तिच्यासाठी

ही कविता तिच्यासाठी
जिची आठवण येताच
डोळे आसवांनी भरतात
नजरा तिला बघण्यासाठी
सैरा-भैरा धावतात
ही कविता तिच्यासाठी

....राहुल घोरपडे....