अमेरिकेतील जपान- दुतावासात घडलेला एक सत्य(?) प्रसंग.....

Started by VIRENDRA, January 19, 2010, 12:36:23 PM

Previous topic - Next topic

VIRENDRA

 
अमेरिकेतील  जपान- दुतावासात घडलेला एक सत्य(?) प्रसंग.....

जपानचे  पंतप्रधान मोरी यांना अमेरिकेत जाऊन बराक ओबामा यांना भेटण्यापूर्वी प्राथमिक   इंग्रजी बोलण्याचे धडे देण्यात आले. 
त्यांना शिकवणाऱ्या माणसाने त्यांना सांगितले...

' तुम्ही जेव्हा ओबामांशी हस्तांदोलन कराल तेव्हा त्यांना विचारा, "  हाऊ आर यु ? "  (HOW ARE YOU ? )
' मग मि. ओबामा म्हणतील,  "आय एम फाईन , अन्ड यु ? " ( I AM FINE , AND  YOU ?) , या वेळी तुम्ही म्हणा, ' मी टु...( ME  TOO ...)'  यानंतरचे सारे काम तुमचा दुभाषा पार पाडील.
किती सोपं वाटत नाही......

आता नक्की काय घडलं ते ऐका....


मोरी जेव्हा ओबामांना भेटले तेव्हा त्यांनी विचारले , " हु आर यु ? ( WHO  ARE YOU ?) ( त्यांना HOW ARE YOU ? विचारायचं होतं.)
ओबामा आश्चर्यचकित झाले, पण हसून  ते म्हणाले, " वेल, आय एम मिशेल्स हसबंड, हा हा ...." ( WELL , I  AM  MICHELLS HUSBAND  HA ...  HA ....)



त्यानंतर मोरींनी प्रतिउत्तर दिलं,
" मी टू.......हा हा.....  ( ME  TOO ....HA HA ...)"




नंतर त्या खोलीत नुसती शांतताच पसरली......


(  ई-मेल द्वारा....)