II अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा , झाली झाशीची राणी II

Started by siddheshwar vilas patankar, March 20, 2017, 07:10:14 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा

झाली झाशीची राणी

आमच्या चाळीत येऊन बघा

जेव्हा येतंय नळाला पाणी II

खुडबुड खुडबुड चालू होते

तांबडं फुटताक्षणी

घागरीवरती स्वार होऊनि

साऱ्या जमती अर्धांगिनी II

नजर रोखुनी फक्त नळावर

कैक नागिणी जणू एक बिळावर

हंडे, कळशी, बादल्या न घागर

तयार साऱ्या पदर खोचुनी

फुत्कार माजे क्षणोक्षणी 

अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा

झाली झाशीची राणी

आमच्या चाळीत येऊन बघा

जेव्हा येतंय नळाला पाणी ॥

घटिका येता सज्ज त्राटिका

ताम्रकडूंचा आवाज मोठा

एक नळासी किती त्या वाटिका ?

अन  किती त्या रौद्र मरदाणी ?

अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा

झाली झाशीची राणी

आमच्या चाळीत येऊन बघा

जेव्हा येतंय नळाला पाणी II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C :D :D :D :D ;D :D :D :D
सिद्धेश्वर विलास पाटणकर C