...........सगऴा बटट्याबोऴ केला!!!

Started by Rahul Kumbhar, January 19, 2010, 04:35:42 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

इतके दिवस विचार केला
सांगू का मी तिला
खूप भीती वाटत होती
ती आणेल् तिच्या भावाला

भावाने तिच्या घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला!


रोज शेवटच्या बाकावरून
बघत् असे मी तिला
ती मात्र बघत असे
माझ्या बाजूच्या बाकावरच्याला

बाजूवाल्याने घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला!


एके दिवशी विचार करूण
तिला गुलाब देऊ ठरविले
त्याच दिवशी मास्तरांनि
बारावीचे गुलकन्द् शिकविले

गुलकन्दाने घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला!


कॅलेंडरात वॅलेंटाइन् डे दोन दिवसात
मग काय् सगऴ्यांबरोबर् मीही होतो कि जोमात्
पण दुसऱ्य़ाच दिवशीची खबरबात
म्हणे तीची पणजी गेली ढगात

पणजीने तीच्या घोऴ केला सगऴा बटट्याबोऴ केला!


एके दिवशी गच्चिवरति पाठ्मोरी तिला बघितले
क्षणात् माझ्या मनातले तिला सान्गितले
पाठ्मोरी ति मुर्ति वळताच् त.. त.. प.. प.. झाले
कारण् मला तिच्या आईचे दर्शन् झाले

आईने तिच्या घोळ् केला सगळा बट्ट्याबोळ् केला!

-Author Unknown

santoshi.world

 :D :D :D hya oli solid ahet ekdam ...............

रोज शेवटच्या बाकावरून
बघत् असे मी तिला
ती मात्र बघत असे
माझ्या बाजूच्या बाकावरच्याला

एके दिवशी विचार करूण
तिला गुलाब देऊ ठरविले
त्याच दिवशी मास्तरांनि
बारावीचे गुलकन्द् शिकविले



gaurig