शब्देविणं संवादु...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 21, 2017, 02:37:26 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

शब्देविणं संवादु
खेळ श्वासांचाच सारा
तुझ्या सन्निद्धनी बैसुनी
वाहे भक्तीचाच झरा
मने बोलती हृदयातून
अश्रू वाहे नेत्रांतून
तुझ्या नजरेतून कळे
प्रेम तुझे ह्या पामरा
बोच लागती ह्या चित्ता
नसे भेट जेव्हा तुझी
वाटे यावे सोडून सर्व
ह्या देहाचा पसारा
ह्या देहाचा पसारा
..©अंकुश नवघरे©..