खरचं कॉलेजात तुझ्यावर प्रेम केलं.

Started by Dnyaneshwar Musale, March 22, 2017, 11:08:23 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

खरचं तुझ्यावर
कॉलेजात प्रेम केलं,
पुस्तक वह्या सोडुन
तुलाच बघण्यात वर्ष सरून गेलं.

नव्हती मला गाडी म्हणुन
सायकलच आधुनिकरण केलं,
पोस्टर वरती नाव तुझं कोरून
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रसिद्धीकरण केलं.

वर्गातला तासही
माझ्यासाठी नव्हता कधी भरला,
तु नसली तर मी वर्ग
तरी कुठं पाहिला.


एक दिवस तु कॉलेजात आली नाही
म्हणुन घरी येऊन तुझ्या विचारपुस केली,
तुझ्या घरच्यांच्या भरमसाठ प्रेमापोटी
रविवारची सुट्टी सुद्धा दवाखान्यात गेली.

कॉलेज कधी भरणार,कधी सुटणार
याच गणित तर तुझ्याकडे होत.
माझं परिक्षेलाही तु किती पेपर
लिहते याकडेच लक्ष होतं.

मी हसावं म्हणुन का काय
तु घालुन यायची गजरा,
पुस्तकावरच्या चित्रावर
बोट ठेवुन गिरवायचो
मग तुझाच लाजरा चेहरा.

एक दिवस धाडस करून
तीन शब्दाचं पत्र तुला लिहिलं,
तासाला बाका खालुन देताना
अख्या वर्गाने तेच उघड्या डोळ्याने पाहिलं.


रोज हातात तुझ्या दोन चार
गुलाबाची फुल असायची,
पण त्यांच्या पेक्षाही गोड मला तुच
जास्त दिसायची.


खरच कॉलेजात मी तुझ्यावर
प्रेम केलं,
म्हणूनतर शेलेपागोटेला तुझ्या
माझ्या नावाचं नामकरण झालं.

कॉलेजनंतर चक्क काल तुला
स्वप्नात मी पाहिलं होतं,
उठुन पुन्हा झोपलो मग
आठवलं तुझ्यावर प्रेम
करतो हे सांगायचंच
राहिलं होतं.