मृत प्रेम...

Started by गणेश म. तायडे, March 23, 2017, 05:03:34 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

होते नव्हते जे काही
वाहूनी आसवात गेले
राहिल्या आठवणी तेवढ्या
हृदय माझे तोडून नेले
ना भावना काही राहिल्या
ना विश्वास आता उरला
उघडताच मनाच्या खिडक्या
अंधार तेवढा मनी दाटला
हात होते रक्ताळलेले
नजर मेलेली होती कधीची
कत्तल करुनि भावनांची
ठेचुनी ती गेली कधीची
ना ती होती ना मी होतो
आता स्मशान रात्र होई
डोळे बंद करता झोपण्या
गळा माझा आवळून येई

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11