राहील फक्त आठवण ....

Started by विजय वाठोरे सरसमकर, March 23, 2017, 05:14:52 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर


तुझी माझी गट्टी जमली होती जेंव्हा
तू अशीच बिलगली होतीस मला
तुझ माझ्या आयुष्यात येण
म्हणजे एक वरदानच ठरल मला
बोलताना मला तू थोडी अडखळायचीस
जेव्हा पहिल्यांदा भेटलीस मला
नुसती एकटक पाहत होतीस माझ्याकडे
मीही थोडा स्तब्ध होऊन राहिलो होतो
नजरेला नजर भिडली
अन तुझीमाझी प्रीत जुळली
तुझी प्रीत निभावण्याची
रीत कळली नाही ग मला
पण तुझी साथ असावी सदैव मला
एवढच मी मागतो ,
आठवण तशी तुझी काढावी लागत नाही
कारण तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस
आणि आज तुझा वाढदिवस म्हणून
तुझ्यासाठी सारा खटाटोप ,
भेट तर होऊ शकली नाही
पण तुझ्यासाठी तुझ्यादिर्घायुशासाठी
तुला आनंदी पाहण्यासाठी म्हणून
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .....!!
जन्मभरासाठी तुझीच साथ मिळावी हीच इच्छा ...!!

........साहिल......
9975593359