खंत देवदूतांची

Started by Asu@16, March 23, 2017, 06:04:24 PM

Previous topic - Next topic

Asu@16

खंत देवदूतांची

नाही माऊली सर्वत्र
काळजी घेण्या अहोरात्र,
म्हणून निर्मिले देवाने
जगी डॉक्टरांचे पात्र.

देव नाही, दानव नाही
संत नाही, महंत नाही
जन गणांची सेवा करण्या
देवदूत म्हणून पाही.

देहाचे या कलाकार
नाही आम्ही जादुगार,
सकल जनांच्या पाठिंब्यावर
यमदूतालाही हरवणार.

उडदामाजी काळे गोरे
इतरत्रही नसते कारे !
वेचूनिया काळे सारे
गोऱ्यांनातरी जीवन द्यारे !

जीवन देणे, नव्हेची घेणे
डॉक्टरांचे जीवन गाणे,
खंत मनीची तुम्हा सांगणे
चूकभूल देणे घेणे.

मागणे आमुचे फार नाही
या देहाची सुरक्षा पाही,
नरदेहाची सेवा करण्या
पाठीवरती हात देई .

- अरूण सु पाटील
  (23.03.2017)

https://www.facebook.com/AsuChyaKavita