मैत्री तुझी

Started by Rupesh Gade, March 24, 2017, 11:08:29 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

तुझ्या मैत्रीचा थोडासा भाग मला ही करशील,
आनंद नाही पण दुःख तरी मला व्यक्त करशील,
का कुणास ठाऊक, तुझ्या भेटीची ओढ माझ्या मनातून जात नाही,
आणि तुला पहिल्या शिवाय मन हि थाऱ्यावर राहत नाही, आठवतो तो दिवस जेव्हा तुला पहिल्यांदा पहिले होते, हृदय शरीरात स्तब्द बनून राहिले होते,  जेव्हा हसलीस तेव्हा नजरेला हि तुला चुकवता नाही आले, डोळे इतके स्थिर होते की त्यात देखील अश्रू आले, कामात जरी असलो तरी मनात तुझाच भास असतो, चोरून च का होईना मी फक्त तुलाच पाहत असतो, आता एक मदत कर, हृदयाच्या जखमांनवर आजून नको देऊस घाव, आणि आपल्या ओळखीला दे आता मैत्रीचे नाव..

                                              -रुपेश मारुती गाडे