गझल

Started by masterkr, March 25, 2017, 12:20:02 PM

Previous topic - Next topic

masterkr

कोमेजली फुले ही होती कधी कळ्यांची
दुखा:त पार बुडली गाणी अशी बियांची

आक्रंदल्या मनाला भिती कशी दयेची
मी तोडली दिवारे माझ्या सुन्या घराची

हिनवुन जात देते बेभान मानवांची
मी सोडले किनारे ही लाट माणसांची

बेधुंद वाहते रे गंगा इथे विषाची
समजुन पार चुकलो कहाणी इथे जीवाची

केदार जोशी
9130838443