शेतकरी राया माझा ईखं का खाताेया.....

Started by suraj-123, March 25, 2017, 08:22:23 PM

Previous topic - Next topic

suraj-123

           शेतकरी -राया....
-----------------

शेतकरी राया माझा इखं का,खातुयां.
गळ्यामंधी फासं घेऊनी का,मरतुयां.
ऊभ्या शेतातलं हिरवंगारं पीक,
करपुनं सारं गेलयां.
कष्टाचं बिजं मातीतं वाहुनी गेलयां.
      शेतकरी राया माझा इखं का,खातुयां.....

मातीतलं साेनचं आता कुठं हरवलंयां.
शेतकर्याच्या नशीबी ,
भाेगं कसलं आलयां.
सावकाराचं करजं फेडता-फेडता,
दिसं नीघुनी गेलयां.
कष्टाची झिजं करुनीयां.
रक्ततं सारंचं आटलयां.
   शेतकरी राया माझा इखं का,खातुयां.....

काेरड्या या दुष्काळामंधी,
पाण्याचा पाझरं आटलां.
  व्यथा शेतकरी-रायाची एेकुन,
कंठ ना कुणाचा दाटलां.
  शेतकरी राया माझा इखं का,खातुयां.....

पाेरकी मायं अनं तिचं लेकरू.
कुणाच्या ताेंडाकडं बघुनं जगलं.
कुणाच्या आशेकडं बघुनं,
दरवाज्यामंधी धण्याची वाट बघलं.
जीतपणी नायं कुणी गवसं घातली.
मेल्यावरं माञ जञाचं भरली.
कधी नव्हती तेवढी ढसाढसा रडली.
पाेरांस साेबतीला घेऊनी,                       
आसं मायेची दावली.
काेपऱ्यात बसुनी माय माञ,
खितपतचं पडली.

दिसं-रातं सरतं गेली.
हाेती-नव्हती गर्दी कमी झाली.
आश्वासनांची मुदत भी संपली.
परीस्थिती माञ तशीचं सुरू राहीली.
बिचारी माय आेळ्या दुःखातुनं,
कसंतरी सावरली.
   पाेरांसंग घेऊनी ती पुन्हा शेतांस गेली....
   पाेरांसंग घेऊनी ती पुन्हा शेतांस गेली....

                      कवी- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                                  (९०७५८३८३५४)
                              (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)