किती झिजायचयं आम्ही....

Started by suraj-123, March 25, 2017, 09:50:22 PM

Previous topic - Next topic

suraj-123

किती झीजायचं आम्ही....
-------------------------

कुणा शेतकऱ्याच्या काळजावरं,
दरपणं आलयां.
कुणाच्या ताेंडचं पाणी सारं आटलयां.
घरामंधी ना आग पेटतयां.
ना भाताचा दाना शीजताेयां.
ऊपाशी पाेटं आमचं आता,
सारचं रीकामं राहीलीयां...

कुणाच्या डाेळ्यासंनी पाण्याचं,
टीपुनभरंसी पाणी भी ना आलयां.
जीव फकतशी सारा ,
पाेरांसाठी झुरताेयां.
राजकरन्यांच्या मायेचा पाझरां,
साराचं आटलयां......

जरा करा की आमच्यावर ऊपकारं.
थाेडं आंम्हासनी भी द्या,
कीती भरतायं तुमचं घरंदारं.
कीती झीजायचं आम्ही शेतांसनी,
अनं तुम्ही खायचं ते आनंदनं गपगारं.
      लाजं वाटुद्या तुम्हांसनी भी थाेडीफारं......

तुमचा आनंद लई गगनासी मावताेयां
परं ,बघा जरा आम्हा शेतकऱ्याकरं,
कसं ईखं खाऊनं ,
अनं फासं घेऊनंसी मरताेया.
आता का नाही तुमचा जीव पाझरंताेयां
दुःखाचा डाेंगरचं साराचं,
   आमच्यावरं काेसळंताेया....

                    कवी-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                       (९०७५८३८३५४)
                        (ता.-मुरबाड,जि.-ठाणे )