त्यांच्या कष्टाचं तु, असं पांग फेडलं...

Started by suraj-123, March 25, 2017, 09:55:09 PM

Previous topic - Next topic

suraj-123

    त्यांच्या कष्टाचं तु,असं पांग फेडलं.....
---------------------------------------

ज्या माय-बापानं तुजं,
जनमं देऊन सांभालळं.
हाताचं चीमुकळं बाेटं धरुनं,
चालायला तुजं शिकवलं.
हाताला धरुनं घेऊन,
तुजं शाळनं नेऊनं धाडलं.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

आपल्या रक्तताचं पाणी करूनं,
तुजं लहानाचं माेठं केलं.
चांगळं-चांगळं खाऊ घालुनं,
तुजं धष्टपुष्ट बनवलं.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

नऊ महीनं ज्या मायनं,
तुजं पाेटात वाढवलयं.
आपल्या रक्ताचं दुध,
तुजं पाजलयं.
कुशीत घेऊनं मायेचा,
पाझरा तुजं दिलायं.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

तुला काय हवं-नकं यासाठी,
तुझ्या बापानं खुपं कष्ट केलयं.
लहानपणांत तुझ्या हट्टाचं,
लाडं त्यांनी पुरवलयं.
रागात जरी येऊनं,
तुजं मारलयं.
राग शांत झाल्यावरं पुन्हा,
तुजं कवटाळुनं घेतलयं.
मारण्याचं दुःख माञ,
त्यांना कायम सतवतयंं.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

लगीनं करुनं तुजं,
नवीन संसारं ऊभं करून दिलयं.
तुझ्या साेबतीला साथ,
आणुनं त्यांनी दिलीयं.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

म्हतारपणातं माय-बापास,
काेपऱ्यात बसवलं.
कधी गाेडा-धाेडाचं केलं तरं,
त्यांसनी हाैसीनं नायं खाऊ घातलं.
तु मजेशीरं राहुनंसी,
त्यांसनी दुःखाचं दिसं दिलयं.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

मरणानंतर माञ लाेकांसमाेरं ,
कंठ दाटवुनं रडताेयं.
गाेडा-धाेडाचं जेवन नंतर,
गावकीला जेवु घालताेयं.
फाेटाे महागडां बनवुनं मग,
हार त्यांसनी राेज घालताेयं.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

पीञा-अमावस्येच्या दिवशी,
घरामंधी खीरं-पुरी बनवताेयं.
त्याच्या आवडीचं जेवनं बनवुन,
त्यांसनी बाेलावनं घालण्याकरतां,
काव-काव आवाज मारताेयं.
कावळ्याला 'माय-बाप' आपलं बनवुनी,
जेवु त्यांसनी घालताेयं.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

जीतपणीं नायं त्यांसनी,
चांगळं खाऊ घातलं.
मेल्यावरं सारचं वीसरूनं,
तु मजेशीर जगताेय.
त्यांच्या कष्टाचं तु,
असं पांग फेडलं....

                       कवी-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                                   (९०७५८३८३५४)
                              (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)