'बा' माझा शेतकरी- राया हाकताेयां नांगर.....

Started by suraj-123, March 26, 2017, 09:19:45 AM

Previous topic - Next topic

suraj-123

' बा' माझा शेतकरी-राया हाकतोया नांगर ....
----------------------------------------

ऊभ्या शेतामंधी 'बा'
माझा शेतकरीराया.
हाकताेया नांगर.
साथ बैलांची त्यासं.
अनं नांगराचा फाळं धारधारं
काळभाेरं जमीनं कसं कापताेयां भरभरं....

फाटक्या कपड्यानं अंग त्याचं झाकल्यालं.
ऊन्हाच्या चटक्यानं अंग त्याचं सारचं तापल्यालं.
डाेई त्याच्या चींध्याचा फेटा.
व्यथा शेतकऱ्याची ऐकुनं,
का! कुणाच्या अंगा येई ना काटा....

कडाक्याच्या ऊन्हामंधी,
काया शेतकऱ्याची तापलीयां.
घामाच्या अंघुलीनंयां,
अंगातली कापरं भी ,
आेळीचींब झालीयां....

चतकुरभरं कांदा अनं भाकरीनं,
पाेटाचं दिसं घालवताे.
तांब्याभरं पाण्यानं,
भुकेची आसं माञ मारतुयां....

दिसं सरूनं रातं डाेई आली.
सर्व आप-आपुल्या घराकडं नीघाली.
बिचारा 'बा' माझा शेतकरीराया,
  ऊभ्या शेतातचं काम करी....
  ऊभ्या शेतातचं काम करी....

                     कवीे- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                            (९०७५८३८३५४)
                             ( ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)