'आता ना चालवेना'.....

Started by suraj-123, March 26, 2017, 11:13:08 AM

Previous topic - Next topic

suraj-123

   आता ना चालवेना.....
-------------------------

खुप झाल्या वेदना.
आता ना साेसवेना.
विखुरलेल्या विस्तावरी,
   आता ना चालवेना....

जातीयतेच्या विळख्यांत रूतुन बसलाे.
आसवांच्या या धारेत न्हाऊन गेलाे.
परी, फाटकी झाेळी आता माझी रीकामी.
त्या झाेळीसही चिंध्यांची थिगळी....
त्या झाेळीसही चिंध्यांची थिगळी....

पाेटी ना मिलं कधी अन्नाचा गाेळा.
भिकेेसही नाही आता, कुणाच्या हाताचा आसरां.
कधी येणार आता,यांस मायेचा पाझरा.
   तापत्या ऊन्हाचा आहे आमुचा निवारा....
   तापत्या ऊन्हाचा आहे आमुचा निवारा....

काेसळत्या भरं पावसात.
तापत्या या ऊन्हांत.
कडाक्याच्या थंडीत.
जीव मुठीत घेऊन जगताेय.
कशा साेसवु ,या मरन यातना.
विखुरल्या विस्तावरी,
   आता ना चालवेना....
    आता ना चालवेना.....

                              ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                                  (९०७५८३८३५४)
                              (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)