कोंडी

Started by Asu@16, March 26, 2017, 02:26:37 PM

Previous topic - Next topic

Asu@16

  कोंडी

संप डॉक्टरांचा
मिटता मिटेना
पडल्या मनास गाठी,
सुटता सुटेना

जगण्याचाही हक्क
मागणे झाले निषिद्ध,
मार खाऊनही काम करा
पत्रके करिती प्रसिद्ध

चहूबाजूंनी धाक धमक्या
डॉक्टरांची झाली कोंडी
कुंपणानेच खाल्ले शेत 
दिले लांडग्यांच्या तोंडी

समाज, सरकार, न्यायालये
नाही कुणाचा सहारा
आपणच करावा आता
आपुला पहारा

हिप्पोक्रॅटसच्या शपथेची
देती सगळे दाखले
नीती नियम आम्हालाच
बाकीच्यांना रान मोकळे !

खाणे पिणे, झोप निवारा
बायका मुले सगळे विसरा
जगणे मरणे समाजासाठी
देईना जो आम्हा आसरा

अंधारल्या वाटा सगळ्या
जगणे झाले भीती
पुन्हा घेतला स्टेथो हाती
तेवण्या आयुष्याच्या ज्योती

सेवेचे व्रत आपुले जगणे
तारणे मारणे त्याच्या हाती,
करू प्रार्थना आपण सगळे
देई यश आमुच्या हाती

- अरूण सु .पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita