गुढीपाडवा

Started by पल्लवी कुंभार, March 27, 2017, 05:28:07 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

घेई समीप चंद्र चित्रेला
होई प्रारंभ चैत्र मासाला
देई शालीवाहन जीव मृदेला
लढी रणांगण मृदासैन्य या दिसाला
होई पराभव शक लोकांचा
विजयी पताका अस्मानी फडफडल्या
रामचंद्रांनी वधला असूड रावणाला
गुढी उभारली आनंदून विजयोत्सवाला
नवचैतन्य पसरे नववर्षाला
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

-- पल्लवी कुंभार