गुडीपाडवा

Started by smadye, March 28, 2017, 02:32:52 AM

Previous topic - Next topic

smadye

गुडीपाडवा

गुडीपाडवा आला बाई
नवं वर्षाची घेऊन नवलाई

काठीवरी घातला उलटा कलश तांब्याचा   
त्याखाली सजल्या  निऱ्या जरीसाडीच्या 
विविध फुलांची आणि निंबपानाची  माला
संगे असे बत्ताश्याचा गोडवा

मला वाटणे गुडी सांगे
काठीपरी तुम्ही उंच चढा रे
पण असावी नम्रता जीवनी
म्हणुनी कलशाची उलटी मांडणी

निंबफाटा  सांगे कडू  अनुभवाचे साठे
जीवनातं त्यांचे महत्व मोठे
ते शिकविती जीवनाचा धडा
मग विजयाची माळा पडेल गळा

गुडी असते दारोदारी
तिची महती काय वर्णावी
पुरातन काळापासून आनंदाची
आणि विजयाची गाते सदैव थोरवी

गुडी आहे  हि एक  प्रथा
पण मला वाटते तिचा आशय जाणावा साचा
मन करावे बळकट
आणि घ्यावे नवीन संकल्प

आयुष्याचे ध्येय गाठण्या
नवं वर्षी सुरुवात करूया
चिंता, भीती, मरगळ घालवुनी
झेप घेऊया पंख फाकुनि

गुढीने सांगितले हे गुपित
समजून घ्यावे त्याच्ये महत्व
आनंद आणि प्रेम वाढवुनी
सण करावा साजरा मनापासूनि

सौ सुप्रिया समीर मडये