खरं होतं कि खोटं...

Started by Prasad.Patil01, March 28, 2017, 06:02:40 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01


तुझं मला भेटणं ,
ते माझ्याशी ते बोलणं,
ते बेनाम नातं जोडणं ,
खरं होतं कि खोटं ..

ते हात हाती धरणं,
ते काळजी तुझं करणं,
ते माझ्यावरचं मरणं,
खरं होतं कि खोटं..

तू बोललेलं सर्व ,
तो प्रेमावरचा गर्व ,
मला कळूच दे सर्व ,
खरं होतं कि खोटं..

ते तुझे सारे भास,
ते सारे क्षण खास,
तू सांग मला आज ,
खरं होतं कि खोटं..

           प्रसाद पाटील
          (स्वलिखित)