हरवलेले प्रेम...

Started by गणेश म. तायडे, March 28, 2017, 11:49:04 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

ओळखीचा असूनही
अनोळखी वाटत आहे
नाव माझेच मला आज
विसरायला होत आहे
जागे असूनही सारे
का ढोंग झोपेची घेतात
गर्दीत मला एकट्यास
सारे का सोडूनी जातात
हातात हात होता घट्ट
कधी सुटला कळलेच नाही
श्वासात श्वास होता गुंग
कधी थांबला कळलेच नाही
बोचऱ्या झाल्या आठवणी
कुणास त्या आठवत नाही
साथ होता जो अविरत
तो आज सोबतीला नाही
बोलायचे काय मी वेडा
वेळ कुणाचं जवळ नाही

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11