सत्य

Started by sachinkagre, January 20, 2010, 01:04:47 PM

Previous topic - Next topic

sachinkagre

तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती;  घूमी .
पलिकडे खड़खड़नारे कारखाने
खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने
मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र
काटे ओलांडित चालले प्रहर
भावंडासह कोनाडा जवळ केला आईने
घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.

तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ
खपत होतो घरासाठीच .....
विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर
तुझ्या खांद्यावर ---
तटतटलीस उरी पोटी
तनु मोहरली गोमटी
एक कौतुक  धडपडत आले ; घरभरले
हादरली चाळ टाळांनी  ; खेळेवाल्यांनी        
वाकलीस खणानारळांनी .  

तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;
तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन
पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन
कोनाडा ह्ळहळला  -कळ्वळला .

'नारायणा' - गदगदला.
'शिंक्यावरची   भाकर घे ' पुटपुटला .
' उद्यापासून तिलाही काम बघ  बाबा '
गांगरलो , भोवंडून स्थीर झालो .
तीच्या ओठावर ओठ टेकवून
बिछान्यासह बाहेर पडलो  . त्या रात्री  ,
तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच..
-----------------------------------------------
नारायण सुर्वे -
माझे विद्यापीठ

sachinkagre

to all Readers,
Kahi words type kartana nemaka shbda type hot navhata......like Antharale chya aivajee Anthaarale  ( Thaa) .....ase 4 te 5 shabda ale asatil ...... :(

shardul


santoshi.world

chhan ahe kavita ...... ekdam mastach :) ..........

correct following words :) ....
अन्थाराले = अंथरले ,
हॉट = होत ,
धड्पदत = धडपडत 

gaurig