***** माफ कर मला *****

Started by Shri_Mech, March 29, 2017, 02:56:43 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

ही कविता एका पत्रासारखी आहे. एक मुलगा त्याच्या प्रेयसीवर खूप प्रेम करायचा आणि अजूनही करतोय पण त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी झालंय. त्यामुळे त्याने आपल्या बायकोला उद्देशून ही पत्ररूपी कविता लिहिली आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे असे खूप जण असतील, त्यांना ही कविता आपलीशी वाटेल अशी आशा करतो.


***** माफ कर मला *****


मी फक्त तुझाच विचार करेन
तुझ्यावर प्रेम असल्याचं सांगेन
"तूच माझी राणी" असं म्हणेन
माफ कर मला, पण ते खरं नसेल


"मी फक्त तुझाच आहे" असं म्हणेन
तुझ्या प्रेमाला साथ देईन
तुझ्याशी साता जन्माचं नातं सांगेन
माफ कर मला, पण ते खरं नसेल


माझा सगळा 'खरा' भूतकाळ सांगेन
तुझ्यावरच्या प्रेमाला सिद्ध करेन
तुझ्या आठवणीने व्याकुळ झाल्याचं सांगेन
माफ कर मला, पण ते खरं नसेल


तुझ्यासमोर प्रेमाच्या शपथा घेईन
तुझा विरह असह्य असल्याचं सांगेन
तुझ्याशी एकनिष्ठ असल्याचं सांगेन
माफ कर मला, पण ते खरं नसेल

कारण....

होती एक परी माझ्या आयुष्यात
गेली मला सोडून ती तिच्या विश्वात
विसरून गेली ती मला पूर्णपणे,
पण, मी अडकलोय तिच्या प्रेमात, कायमचा....

जमलंच, तर माफ कर मला...


Shri_Mech
Shri_Mech