तू..

Started by swapnil_123, March 30, 2017, 07:54:09 PM

Previous topic - Next topic

swapnil_123

का सतत अस वाटत कि तू ऑनलाईन असावस
माझ्या शिवाय कोना दुसऱ्याशी ना बोलावस..

तुला ऑनलाईन पाहून मन भारावून जात माझं
काय बोलू काय नाही ह्यात वेळ सरून जातो सारा..

माझ्या मनातले सांगायची हिम्मत करतो मी,
तेव्हाच तुझा पिंग येतो "नंतर बोलू प्लीज"...

मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात
निरव्यक्त भावना तश्याच घुसमटत राहतात..

पुन्हा चालू होतो ऑफलाईन ते ऑनलाईनचं चक्र....
अनं पृथ्वी पासून सूर्य गाठायचा हट्ट...

स्वप्नील शशिकांत पवार