*काय आहे तुझ्या मनात माझ्या साठी सांग तरी*

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 30, 2017, 10:53:03 PM

Previous topic - Next topic


आता तुझा फोन
पण येत नाही
तुझा साधा मेसेज
सुद्धा येत नाही

*काय आहे तुझ्या मनात*
*माझ्या साठी सांग तरी*

तुला आता माझी
थोडी सुद्धा आठवण
होत नाही तुला पुन्हा माझी
आठवण येईल यासाठी
काय करू सांग तरी

*काय आहे तुझ्या मनात*
*माझ्या साठी सांग तरी*

तुझ्या साठी खूप
जीव रडू राहिलाय
काय सांगू तुझ्यावर
खूप माझा जीव जडलाय

*काय आहे तुझ्या मनात*
*माझ्या साठी सांग तरी*

तुझं रुसणं असेल
तर काय करू सांग तरी
तुझं हसू पाहण्यासाठी
या हृदयाचं खेळणं
करून देईल मी पुन्हा
तुला माझ्या प्रेमासाठी

*काय आहे तुझ्या मनात*
*माझ्या साठी सांग तरी*

झोपेत जरी असलो मी
तुझ्या स्वप्नात डचकून उठतोय
तू माझ्या स्वप्नात येणार नाहीस
तरीही जागेपणी
स्वप्न तुझे पाहतोय

*काय आहे तुझ्या मनात*
*माझ्या साठी सांग तरी*

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटिल).मो.9637040900.अहमदनगर