विरह सुरांची

Started by Kumar Sanjay, March 31, 2017, 09:47:49 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

 वारा उडवून गेला
पायवाटेतल्या कहाण्या
मेघावर दिसती
स्मरणाच्या पापण्या

शब्द अखेरचे उरले
कंठ दाटतो जेथे
तुही बरसुन जाशिल
साजण सोडतो तेथे

उरून गाशिल गाणी
किती तुझ्या व्यथेची
वेणुतुन फुटतील
कथा विरह सुरांची

# कुमार संजय

7709826774