वेळ...

Started by masterkr, March 31, 2017, 12:38:41 PM

Previous topic - Next topic

masterkr


शरीरात त्राण असता रुसतात का शहारे
जगण्यास भान येता भरतात का किनारे

जगी जीवनाला उगा काय बोलु
वेळेस जान ज्याची त्याचाच केंद्रबिंदु
हुंदक्यात आसवाच्या आता कुठे सहारे
जगण्यास भान येता भरतात का किनारे

मिळतात मान येथे सुगंधी फुलांना
छळतात घाव सारे उगा काळजांना
शोधु कसेच आता माझे मला निवारे
जगण्यास भान येता भरतात का किनारे

                        ___   केदार जोशी