विछ्या नाही माझी प्रसिद्धी मिळवण्याची

Started by Dipakds, March 31, 2017, 02:48:54 PM

Previous topic - Next topic

Dipakds

विछ्या नाही माझी प्रसिद्धी मिळवण्याची
तूम्ही मला ओळखता एवढेच पुरे आहे.
चांगल्यानी चांगले आणि वाईटानी वाईट ओळखले मला
कारण ज्यांना जेवढी  गरज होती त्यांनी तेवढे जाणले मला

जीवन पण किती विचित्र आहे
कातरवेळ लवकर टळत नाही
आणि वर्ष चटकन निघुन जात आहेत.

एक वेगळिच स्पर्धा आहे हे जीवन
जिंकलो तर आपले मागे राहतात
आणि हारलो तर आपलेच मागे सोडून जातात.

बसतो जमिनीवर कधीतरी कारण
मला माझी लायकी चांगली कळते,
मी समुद्राकडून शिकलो जीवन कस जगायचं
चुपचाप वाहायच आणि आपल्याच आनंदात रहायचं.

असे नाही की माझ्यामधे काही विश्वास नाही
पण खरे सांगतो माझ्यामधे काही विश्वासघातसुद्धा  नाही

एक घडयाळ विकत घेउन हातामधे काय बांधले
वेळ पाठिमागेच लागला माझ्या...

विचार केला होता घर बांधुन आरामात राहीन
पण घरच्या गरजांनी यात्रेकरू बनवलं

सुखाची गोष्ट सांगू नकोस ये ग़ालिब
लहानपणिचा रविवार आता येत नाही
का वेळेबरोबर आवड कमी होत जाते?
हसते-खेळते जीवन सुद्धा सामान्य होउन जाते

एक सकाळ होती जेव्हा हसत उठत होतो आम्ही
आज अनेकवेळा न हसताच रात्र होते.

किती दूर निघून गेलो
नात्यांना सांभाळता सांभाळता
स्वत: ला विसरलो आम्ही
आपल्या लोकांना मिळवता मिळवता...

लोक म्हणतात आम्हि खुप हसतो
पण आम्ही थकलो दू:ख लपवता लपवता .

खुश आहे आणि सर्वांना खुश ठेवतो
निष्काळजी आहे तरीही सर्वांची काळजि करतो
माहीत आहे काही मूल्य नाही माझे
तरीही काही अमूल्य लोकांशी नाती जपतो...
-- हरिवंशराय बच्चन
Translated into Marathi by Deepak Devkar
31/03/2016