कविता क्र. ५ गीतांजली (रवींद्रनाथ टागोर)

Started by Dipakds, March 31, 2017, 02:56:17 PM

Previous topic - Next topic

Dipakds

मला माहीत नाही तू कसा गाणे गातोस माझ्या देवा
मी नेहमी ते नेहमी  शांत मनाने एकतो.

तुझ्या गाण्यातील प्रकाश हे जग प्रकाशित करीत आहे.
तुझ्या गाण्यातील प्राणवायु नभानभांतुन दरवळत आहे.
तुझ्या गाण्याचा पवित्र प्रवाह वाटेतिल सर्व दगडी अड़थळे दूर करीत आहे.

माझे ह्रदय तुझ्या गाण्यात सामिल होण्यास उताविळ आहे,
पण एका स्वरासाठी व्यर्थ संघर्ष करीत आहे.
मी बोललो ,पण माझ्या शब्दांचे गाणे झाले नाही ,आणि मी गोंधळुन गेलो.
आ हां !
तुझ्या गाण्याच्या अमर्याद जाळ्यात माझे ह्रदय तू बंधिस्त केले आहेस, माझ्या देवा!.

Translated into Marathi by Deepak
02/10/2014