'दारीद्र्य'......

Started by suraj-123, March 31, 2017, 06:15:44 PM

Previous topic - Next topic

suraj-123

दारीद्रय...
--------------

का? हे दारीद्र्य,
आम्हा शेतकऱ्याच्या नशीबी.
कधी नं आमच्या डाेळी,
सुखाचं दिसं पदरी पडतं.
नं कधी मिळत पाेटांसनी,
पाेटभर अन्नाचं दाेन घास.
मागच्या वरसाला,
दुष्काळांमधी सारी शेती.
करपुन गेली.
सावकाराच्या करजाचा डाेंगर,
आमच्या डाेई ठेवुन गेली.
आता सावकाराचं करजं फेडण्यासाठी.
दुसऱ्याच्या शेतांसनी कष्ट करताेय.
सलसळत्या या ऊन्हात,
स्वतःचं अंग सारं भाजुन घेताेय.
कसा-बसा जीव मुठीत घेऊन.
एकदाचा दीस आमचा लाेटताेय.
आम्ही दाेघं नवरा-बायकाे,
पाेटासाठी अन्नाचा गाेला कमुवनसी,
भुकेलेल्या लेकरांना ,
एक वेळचं जेवु घालताेय.
घरामधली दाेन छाेटी-छाेटी लेकरं.
अनं लगणाच्या वयात आलेली पाेरं
यांसाठी आम्ही सारखं धडपडताेयं.
दगडाली ठेच लागल्यासारखी,
जीव आमचा जखमांनी साेसताेयं.
मजुरी करुन त्यांसनी सांभाळताेयं.
दारीद्र्यांच्या विळख्यांत पडुन जगताेय.
अंश्रु सारं दुःखाचं ,
डाेळ्यांत गाेठवुन ठेवताेयं.
लेकरांना सिकण्याची लई हाऊस हायं.
पण खुप सारा पैका सिकण्यासाठी,
आमच्याकडं नायं.
पाेरीच्या लगणाचं त्यातचं,
भळं माेठं आेझं डाेई हायं.
आता सारचं आेझं डाेई आलयं.
या अशा दारीद्र्याच्या जगण्यानं,
जीव सारं नकाेसा केलायं.
वेदनांनाही माझ्या घरच्या,
वाटेची चाहुल माञ लागलीयं
जीव हा सारखा तलमळताेयं
दाेन पैक कमवाला ,
कीती ऊन्हत झिजावं लागतयं.
हे फक्त एका शेतकऱ्यालाचं कळतयं
हे नां कळणार या,
निष्ठुर राजकारणी लाेकांसनी.
डाेळ्यांवर त्यांच्या अंधेरी आलेयां.
समाेरचं दीसुन भी ,
मजेशीर ते जगतात .
अनं सारं काही आम्ही पाहुनं.
त्यांकडं मत मागण्यासाठी येतात.
अन मागल्या हाताल आश्वासणांची,
ग्वाही देऊनसी परतीच्या वाटा धरतात....
ग्वाही देऊनंसी परतीच्या वाटा धरतात....

                   कवी- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                          (९०७५८३८३५४)
                          (ता.- मुरबाड, जि-ठाणे.)