'बालपण'......

Started by suraj-123, April 01, 2017, 01:31:30 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'बालपण'
---------------

  काय असतं ना हे लहाणपणं.....
ना काेणाला कशाचं सुख ,
ना असतं कशाचं दुःख.
सारेच आपलं जग वाटतं.
या त्या लहाणग्याच्या जिवनात.

सारेचं विश्वाचे सुख जणु,
लाेंटागण घालत फिरत असते.
त्याला कशाची ना भिती वाटते.
जिथं-तिथं सारचं आपलसं वाटत.
कधी आईच्या कुशीत लाेंटागण घालतं.
तर कधी कुणाच्या ताटात जाऊन जेवत,

खरचं किती निरागस असतं,
हे प्रत्येक चिमुकल्याचं जीवण
सतत कुणीतरी गाेड-धाेडं खाऊ देत.
सारीचं स्वतःच्या उराशी,
कवटालुनं मायेचा पाझरा देतात.
त्या चिमुकल्याचं निरागस रडणं -हसणं
सारचं सर्वाना माेहुण टाकत.
जणु काय आपलसं समजुन,
त्याला ते खेळवत राहतं

आईच्या प्रेमळ कुशीत,
निजण्याचं सुख त्याला मिळत
त्याने कीतीही मस्ति केली
कुणाला कितीही ञास दिला,
तर त्याला सारचं माफ
नाही त्याच्या डाेक्यास ,
असताे कसला ताप.
आईचं जास्त लाडाचं.
प्रत्येक बाळ असतं
खरचं कुणीतरी म्हटलं की,
  रम्य ते बालपण असतं...
   रम्य ते बालपण असतं...

                     कवी -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                               (९०७५८३८३५४)
                             (ता.-मुरबाड, जि.-ठाणे.)