मनाला समजून घेणार असं कोणतरी हवं होतं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 01, 2017, 10:50:52 PM

Previous topic - Next topic
मनाला समजून घेणार असं
कोणतरी हवं होतं म्हणून तर
मी तुझ्या वर प्रेम केलं होतं

का कोणास ठाऊक होतं
जे आपलंसं वाटलं होतं
तेच आज परक्या सारखं वागू लागलं होतं
बोलणार नव्हतीस तर का
या हृदयाचं खेळणं केलं होतं

का आशा दाखवली होतीस
का या दुःखी जीवाला सुखाची
ती तुझी तुटपुंजी साथ दिली होतीस

आज पण तुझ्या चेहऱ्या वर हसू
असले तरी हे मन दुःख असून
देखील सुखाचे अश्रू ढाळत होतं


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर