सृष्टीची हेळसांड !!!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 02, 2017, 08:46:15 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

सृष्टीची हेळसांड
--------------
जिकडे पाहावं तिकडे
सिमेंटची जंगलच झालीत
पर्यावरणाच्या झेंड्याची
चांगली चंगळच झालीत
**
दिसेनात आता कुठे
विशाल महाकाय वृक्ष
विश्रांतीच्या नावाखाली
आता गफलतच झालीत
**
नाही राहीला निवारा
पिला पांखरा आधार
माणसाची आता मात्र
पुरी जंजाळच झालीत
**
सोसवेना भूमीस आता
हा आगिचा भडका
लाही लाही होते जीवाची
जगाय अडचणीच झालीत
**
आता तरी घ्या ध्यानात
झाडें लावा पाणी जिरवा
एक तरी झाड लावा
हेच पर्यावरणच झालीत
**
प्रकाश साळवी
०१ एप्रिल २०१७
०९१५८२५६०५४