एकांत

Started by Rahul Ghorpade, April 03, 2017, 12:15:47 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

♥.....एकांत.....♥

एकांतातचं बसायला
आवडत मला
विचारांच्या चक्री वादळात
स्वतःला हरवून
टाकावावसं वाटत मला...

निसर्गाच्या सानिध्यात
रमावासं वाटत मला
एकांती बसल्यावर
ह्रदयातील सर्व
प्रश्नांची उत्तरे सापडतात मला...

एकांती बसल्यावर
पाहत असतो मी
सर्व पशु पक्षांना
संकटांशी मात करत असताना...

आयुष्यातील प्रत्येक
संकटांशी झुंजण्याची
आत्मशक्ती वाढते माझी
असं पाहून पशू पक्षांना...

एकांतीच बसायला
आवडत मला
आणी
एकांतचं
आवडतो मला...

....राहुल घोरपडे....