निर्झर मंद श्वासांना

Started by शिवाजी सांगळे, April 03, 2017, 10:50:27 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

निर्झर मंद श्वासांना

रेघोट्या धुळी वरल्या, बरचं सांगुन जातात,
कणां कणां सोबत, स्मृतीही गंधीत होतात !

उरले भाग्य इतके, हरित कोवळ्या पानांला,
गुढखेळ सावल्यांचा, सरावला तो मातीला !

गंध विझल्या वातींचा, दरवळतो हा अासमंती,
विरघळल्या मनाच्या, घेवुन श्वासांना सांगाती !

स्मरेल कहानी अधुरी, त्या निर्झर मंद श्वासांना,
चढतील रंगही गगनी, लुकलुकत्या तारकांना !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९