जन्म घेई रामराया

Started by Asu@16, April 04, 2017, 12:00:30 PM

Previous topic - Next topic

Asu@16

 जन्म घेई रामराया

रामराज्य जगी येण्या
जन्म घेई रामराया
आयुष्य झाले नित्य लढाया
राहिली नाही दयामाया

राहिली नाही सीतामाई
नाही राहिला लक्ष्मणभाई
एक मागणी असे रघुराई
फक्त नसावी मंथरादाई

मातले राक्षस जनीवनी
जनतेचे ऐकेना कुणी
रावण झाले जागोजागी
निर्दालन करण्या यावे जगी

पसरविण्या जगी सुखछाया
अंजनीसूत पडतो पाया
रामराज्य जगी येण्या
जन्म घेई रामराया

- अरूण सु . पाटील
  (04.04.2017) रामनवमी

https://www.facebook.com/AsuChyaKavita